October 28, 2026 8:16 am

खुनाच्या प्रयत्नासह २६ गंभीर गुन्ह्यांतील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; कोर्ट परिसरातून थरारक अटक!

Oplus_131072

बिश्नोई टोळीला कोल्हापुरात मोठा धक्का!

खुनाच्या प्रयत्नासह २६ गंभीर गुन्ह्यांतील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; कोर्ट परिसरातून थरारक अटक!

कोल्हापूर : लोकहिरा न्यूज प्रतिनिधी

कुख्यात बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या आरोपीवर कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत त्याला थेट न्यायालय परिसरातून ताब्यात घेतले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मारामारी, बलात्कार तसेच सरकारी कामात अडथळा आणणे अशा गंभीर स्वरूपाच्या तब्बल २६ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीराम मांजु ऊर्फ पाचाऱाम बिश्नोई (वय २९, राजस्थान) हा कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला हवा असलेला आरोपी होता. त्याच्याविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता.

न्यायालय परिसरात पोलिसांचा सापळा!

आरोपी न्यायालय परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचला. काही वेळातच आरोपी तेथे पोहोचताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घालत ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याचे नाव व पत्ता निश्चित केला.

गुन्ह्यांची लांबलचक यादी; पोलिसांकडून कसून तपास

प्रेसनोटनुसार, आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, खुनासह दरोडा, बलात्कार, विनयभंग, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, गर्दी करून मारामारी आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी २०२० मध्ये कोल्हापूर येथील टोल नाका परिसरात पोलिसांवर गोळीबार केल्याचा प्रकार घडल्याचाही प्रेसनोटमध्ये उल्लेख आहे. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आरोपीविरुद्ध दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि संबंधित पोलीस पथकाकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपीच्या इतर गुन्हेगारी कारवायांबाबतही माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण तसेच त्यांच्या पथकाने केली. कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!