October 28, 2026 8:12 am

आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू; मच्छी मार्केट परिसरातील धक्कादायक घटनेने खळबळ..

जयसिंगपूर : लोकहिरा न्यूज प्रतिनिधी राजू टिळंगे

शहरातील मच्छी मार्केट परिसरात आईसह तिच्या दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. संगीता राजू गाडीवडर (वय २५), प्रगती राजू गाडीवडर (वय ४) आणि प्रतीक (वय दीड वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने जयसिंगपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.संगीताचा दीर सायंकाळच्या सुमारास कामावरून घरी परतला असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. बराच वेळ हाका मारूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडून घरात प्रवेश करण्यात आला. त्यावेळी घरातील दृश्य पाहून कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले.आत्महत्येमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून संगीता हिने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक परिस्थितीसह विविध शक्यतांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात दोन्ही मुलांनंतर संगीताने स्वतःचे जीवन संपविल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.या घटनेमुळे जयसिंगपूर शहरात शोककळा पसरली असून, या तिहेरी मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान जयसिंगपूर पोलिसांसमोर असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस ठाणे करत आहे.
लोकहिरा न्यूज साठी राजू टिंळंगे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!