August 3, 2026 5:02 pm

“टाक्यावरची पोटं” व “पावनखिंडीचे सत्य” हे दोन्ही पुस्तके शिक्षक विद्यार्थी व तरुणांना प्रेरणा देतील:- आमदार जयंत आसगावकर

  • पुस्तक प्रकाशन सोहळा 🌹

लोकहिरा न्यूज वृत्तसेवा

कोल्हापूर – इतिहास अभ्यासक व मोडी लिप्यांतरकार अशोक मानकर सर लिखित “पावनखिंडीचे सत्य” या शोधनिबंधाचा व “टाक्यावरची पोटं” या आत्मचरित्र शब्दचित्राचा प्रकाशन सोहळा कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ सभागृह येथे पार पडला
” सध्या दाखवली जाणारी पावनखिंड हा कासारी नदीचा उगम आहे.या ठिकाणी बाजीप्रभूंनी बलिदान केले असा चुकीचा इतिहास सांगितला जातो.ही खरी पावनखिंड नसून बाजीप्रभूंची खरी लढाई विशाळगडासमोरच झाली. त्या ठिकाणी छोटीशी खिंड आहे. तीच खरी पावनखिंड आहे.” असे प्रतिपादन पुस्तकाचे लेखक श्री. अशोक मानकर यांनी केले. त्यानी आपल्या प्रस्ताविकात नामदेव शिंपी समाजाचा इतिहास, आपल्या घराण्याचा इतिहास व आपल्या जीवनामध्ये घडलेल्या सर्व चांगल्या वाईट घटनांचे चित्रण “टाक्यावरची पोटं ” या आत्मचरित्र शब्द चित्रांमध्ये केले असल्याचे सांगितले.
शिक्षक आमदार जयंत आसगावकर आपल्या भाषणात म्हणाले की मानकर सर हे उत्तम मोडी लिपी जाणकार असून इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांची दोन्ही पुस्तके शिक्षक विद्यार्थी व तरुणांना नेहमीच प्रेरणा देतील.
मुख्याध्यापक संघाचे सेक्रेटरी श्री. आर. वाय. पाटील सर यांनी मानकर सरांची दोन्ही पुस्तके शाळा व विद्यार्थ्यांना उदबोधक असून त्यांच्या ज्ञानात भर घालतील व सर्वांनी ती वाचावीत असा प्रयत्न करू. असे प्रतिपादन केले.
यावेळी साहित्यकार बाबुराव शिरसाट, डॉ. सचिन कोंडेकर, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणधीर मोरे, जि प सदस्य संयोगिता मोरे, मुख्याध्यापक टी. जी. गायकवाड सर, ग्रामीण कथाकार दत्ता परीट सर, यंत्र अभियंता सुकन्या मानकर व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने हजर होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!