August 3, 2026 6:28 pm

आषाढी एकादशीच्या औचित्याने कराओके वरील “विठ्ठल माझा” कार्यक्रमाचा प्रति पंढरपूर नंदवाळ येथे होणार शुभारंभ….

श्री विठ्ठल भक्तीच्या गीतांचआषाढी एकादशीच्या औचित्याने कराओके वरील “विठ्ठल माझा” कार्यक्रमाचा प्रति पंढरपूर नंदवाळ येथे शुभारंभ…...
———- लोकहिरा न्यूज वृतसेवा
आषाढी एकादशीचे औचित्य साधून कोल्हापूर येथील “श्री ब्रह्मचैतन्य ग्रुप” ने “विठ्ठल माझा”या विठ्ठलभक्ती पर गीते,अभंग यांच्या कराओकेवरील कार्यक्रमांचे निर्मिती केलीआहे. कोल्हापूर येथे दि.१८ते २५जुलै या कालावधीत वेगवेगळ्या संस्थांच्या सौजन्याने वेगवेगळ्या ठीकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.
या कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवार दि.८जुलै रोजी प्रती पंढरपूर असलेल्या श्री क्षेत्र नंदवाळ येथील श्री विठ्ठल मंदिरात सायंकाळी पाच वाजता उत्कृष्ठ सेवावृत्ती कराओके गायक राज्यस्तरीय पुरस्कार विजेते ,कार्यक्रमाचे निर्माते अभय नेर्लेकर व सहभागी हौशी कलाकार भक्तीगीते, अभंग यांची गान सेवा श्री विठूरायाचे चरणी सादर करून श्रीं चे आशिर्वाद घेवून कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहेत.यावेळी उद्योजक अभय देशपांडे,उद्योजक व माजी सरपंच चंद्रकांत काडेकरी,यूथ फौंडेशनचे राहूल चौधरी आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.तरी सर्व विठ्ठल भक्तांनी यांचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपचे अभय नेर्लेकर यांनी केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!