मुंबई येथील लोकहिरा न्यूज वृत्तसेवा
समाजसेवक श्री. विलास नामदेवराव व्हटकर यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत पुणे येथील संस्थेतर्फे त्यांना “ग्रीन वर्ल्ड रियल अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार शनिवार, दि. २३ मे २०२६ रोजी पुणे येथे आयोजित भव्य सोहळ्यात माननीय श्री. दिलीप गावडे (IAS)(से. नि.), विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) तसेच माननीय श्री. अजय केसरी (IRS), इन्कम टॅक्स कमिशनर, पुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी पुरस्कार स्वीकारताना श्री. विलास व्हटकर यांच्यासमवेत सौ. शारदा व्हटकर (पत्नी), श्री. आशिष व्हटकर (मुलगा), सौ. रूचिरा व्हटकर (सुन) व कु. इनाया (नात) उपस्थित होते.
समाजकार्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.















