April 18, 2026 12:08 am

मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंद .

    Oplus_131072
Oplus_131072
राधाई दातांचा दवाखाना.

हेरले येथे भरधाव बसची धडक; पादचाऱ्याचा मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी;- सागर चौगुले

हातकणंगले  तालुक्यातील हेरले गावात भरधाव वेगाने धावणाऱ्या बसची धडक लागून एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना १६ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हारुण मेहबुब मुल्ला (रा. कराड रोड, आईस्क्रीम फॅक्टरी पाठीमागे, विटा जि. सांगली) हा आपल्या ताब्यातील आराम बस (क्रमांक AR 01, T  9063) भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत असताना हेरले गावातील सांगली–कोल्हापूर मार्गावर संदिप कोले यांच्या घरासमोर रस्ता ओलांडत असलेल्या अमित सुनिल लोखंडे (वय ३५, रा. मातंग समाज, हेरले, ) यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी हातकणंगले पोलिसात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी फिर्याद मिळाल्यानंतर हातकणंगले पोलिसांनी तातडीने पंचनामा करून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.लोकहिरा न्यूज प्रतिनिधी सागर चौगुले

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!