August 3, 2026 7:15 pm

मिरज येथील कृष्णा घाट येथे दोन दिवसीय “कृष्णावेणी उत्सव २०२६” भक्ती पूर्ण व सांस्कृतिक वातावरणात साजरा

8 मार्च रोजी होणाऱ्या वर्धापन दिना निमित् जाहिरात व पुरस्कारा साठी संपर्क 7276756577

 ।

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी

मिरज येथे कृष्णा घाटावर “कृष्णा वेणी उत्सव२०२६”चे आयोजन दि.२१व२२फेब्रुवारी रोजी कृष्णावेणी उत्सव समितीने केले होते. उत्सवाचे पहिले दिवशी  मिरजेच्या श्री अंबाबाई मंदीरातूनकृष्णामाईच्या  पालखी सोहळ्यास प्रारंभ होवून एक नंबर शाळा,जिलेबी चौक ,शिवनेरी चौकमार्गे श्री दत्तमंदीर या पालखी मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे स्वागत केले व भक्तीमय वातावरणात कृष्णानदी घाटावर कृष्णामाई मूर्तीची विधीवत  प्रतिष्ठापना होवून नगरसेवक संजय बापू मेंढे, नगरसेविका बबिता मेंढे,पोलीसउपनिरीक्षक रुपाली गायकवाड या मान्यवरांचे हस्ते देवीची आरती झाली. उत्सवाचे निमंत्रक ओंकार शुक्ला व इतर पदाधीकारी यांनी मान्यवरांचे स्वागत, सत्कार केले. कोल्हापूरच्या श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपच्या अभयकुमार नेर्लेकर, स्नेहा मुणगेकर,राजश्री सुर्यवंशी या कलाका- रांनी नवीन संकल्पनेने कराओके ट्रँकवर गीतरामायणाचा बहारदार कार्यक्रम सादर केला तर आदीत्य मैंदर्गीकर व अश्वीनी टेंबे यांनी आपल्या निवेदनाने रसिकांना खिळवून ठेवले.कार्यक्रमास रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. उत्सवात दुसर्यादिवशी म्हणजे २२फेब्रुवारी रोजी सकाळी कृष्णामाई याग,मूर्तीस अभिषेक होवून कृष्णामाईस विधीवत ओटी अर्पण सोहळा पार पडला. दुपारी सांगली येथील स्वरसाधना संगीत कला अकादमीच्या सुनीता चव्हाण, अभिषेक चव्हाण यांच्या अभंगवाणी कार्यक्रमाचे  आयोजन करणेत आले होते. अमिता करंबेळकर, मयुरी फडके, गायत्री पटवर्धन यांच्या कथ्थक नृत्याविष्कारा- चे नियोजन या उत्सव सोहळ्यात करणेत आले होते.सायंकाळी कृष्णामाईची महाआरती तसेच मिरजकर ब्रम्हवृंदाचा मंत्रपुष्प व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम समितीच्या वतीने पार पडला. भक्तीमय वातावरणात या उत्सवाने मिरजकर व पंचक्रोशीतील रसिकांना संगीताची पर्वणी मिळत असून संथ वाहणार्या कृष्णा नदी विषयी जनतेच्या मनात आपलेपणा वृध्दींगत होत आहे.या संपूर्ण उत्सवासाठी निमंत्रक ओंकार शुक्ला यांचेबरोबर कार्यक्रम प्रमुख श्रीपाद भट,अनघा कुलकर्णी,संतोष कुलकर्णी,भालचंद्र शुक्ला,सुप्रीया जोशी, रेखा शेजवळ,माधुरी चौगले,आठवले,धर्मवीरकर,निलेश साठे, चैत्राली शुक्ल,ज्योती शुक्ल,आकाश सोनेकर , अपर्णा सोनेकरआदी मंडळींचे विशेष सहकार्य होते

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!