लोकहिरा न्यूज प्रतिनिधी :- मारूती शिंदे
इचलकरंजी येथील





शहापूर पोलीस ठाणे ची उत्कृष्ट कामगिरी.
एक डिसेंबर 2025 रोजी ज्ञानेश्वरनगर निमशिरगाव रोड तारदाळ तालुका हातकणंगले या ठिकाणी
फिर्यादी हरी मारुती चोपडे वय 44 यांचे बंद घराचे कुलूप लावुन फिर्यादी ची आई या शेजारी नातेवाईकांचे घरी गेल्या असता कोणीतरी अज्ञात इसमान त्याचे घराचे कुलूप कशाने तरी उचकटुन काढुन आत प्रवेश करुन घरातील लोखंडी तिजोरीतील वरील वर्णनाचे एकुण 5,76,000/- रु किंमतीचे सोन्या दागिने फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीचे इरादयाने चोरुन नेलेबाबत यातील फिर्यादी यांनी दिले फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
सदर दाखल गुन्हा उघडकीस आणणे बाबत मा. श्री योगेशकुमार गुप्ता साो,पोलीस अधिक्षक कोल्हापुर तसेच मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. आण्णासाहेब जाधव सो यांनी दिले सुचना प्रमाणे मा.श्री. विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग यांचे मार्गदर्शना प्रमाणे शहापुर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. सुर्यवशी साो यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अमंलदार व तपासी अधिकारी यांना सुचना दिल्या त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार व गुन्हयाचे तपासी अंमलदार असे गुन्हयाचे अनुषंगाने पोलीस ठाणे हददीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय बातमीदार मार्फ़त माहिती मिळाली कि, दोन इसम वरील गुन्हयातील मुढेमाल सोने हे विक्री करणेचे उददेशाने यड्राव भागात येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली त्याप्रमाणे तपास पथकाचे अंमलदार सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन सदर इसमांना ताब्यात घेवुन त्याचे कडे अधिक चौकशी करता त्यांचे अंगझडती मध्ये सोन्याचे दागिने मिळुन आले सदर सोन्याचे दागिने बाबत त्याचे कडे अधिक चौकशी केली असता त्यानी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांनतर त्यांना विश्वासात घेवुन त्यांचे कडे अधिक चौकशी करीता त्यांनी तारदाळ गावी चोरी केलेची कबुली दिली तसेच शहापुर पो ठाणे, हातकणंगले, पो ठाणे, कुरुंदवाड पोलीस ठाणे सांगली ग्रामिण पोलीस ठाणे हददीत घरफोडी गुन्हे केलेची कबुली दिली आहे. सदर आरोपी
प्रल्हाद विठठल कवठेकर वय ३० वर्षे रा. संगमनगर बिरोबा मंदीर जवळ तारदाळ ता हातकणंगले 2) उदय श्रीकांत माने वय-29 वर्षे रा. बेघर वसाहत यड्राव ता शिरोळ यांचे कडील गुन्हयातील माल एकुण 43 तोळे 700 मीली वजनाचे 53,74,000/- (त्रेपन्न लाख चौ-याहत्तर हजार) किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच गुन्हयात वेळी वापरलेली मोटरसायकल, आरोपीत याचा मोबाईल असा मुदेमाल जप्त करणेत आला असून हि कारवाई मा. पोलीस अधिक्षक, कोल्हापुर श्री योगेशकुमार गुप्ता साो,
मा.अप्पर पोलीस अधिक्षक, गृह विभाग कॅम्प इचलकरंजी, श्री आण्णासाहेब जाधव साो,
मा.उपविभागीय पोलीस अधिकारी. इचल. विभाग श्री विक्रांत गायकवाड साो याचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री सचिन सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर,पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे,रोहित डावाळे, आयुब गडकरी,अर्जुन फ़ातले, सतिश कुंभार, शशिकांत ढोणे, रविंद्र महाजन यांनी केली तर
सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरीष्ठांचे मार्गदर्शना प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, शहापुर पोलीस ठाणे हे करीत आहेत












