October 28, 2026 8:06 am

मार्डीत शहीद भगतसिंग यांची जयंती उत्साहात

मार्डी येथे शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करताना माजी सैनिक मेजर लक्ष्मण राठोड, मेजर मारुती जाधव, बाळासाहेब देशमुख, शिवाजीराव सोनार, विष्णू जगताप, संजय खरटमल, प्रशांत काशिद आदी.
मार्डी येथे शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करताना माजी सैनिक मेजर लक्ष्मण राठोड, मेजर मारुती जाधव, बाळासाहेब देशमुख, शिवाजीराव सोनार, विष्णू जगताप, संजय खरटमल, प्रशांत काशिद आदी.

देशभक्तीची प्रेरणा देणाऱ्या क्रांतिकारकाच्या स्मृतींना मान्यवरांकडून अभिवादन

उत्तर सोलापूर ( लोकहिरा न्यूज प्रतिनिधी) :
मार्डी येथे निर्मल हृदय दादा युवा प्रतिष्ठान आणि संत वीरशैव कक्कय्या समाज प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद क्रांतिकारक भगतसिंग यांची जयंती श्रद्धा व देशभक्तीच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

यावेळी माजी सैनिक मेजर मारुती जाधव आणि मेजर लक्ष्मण राठोड यांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख होते.

यावेळी शिवाजीराव सोनार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री विष्णू जगताप, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय खरटमल, प्रशांत काशिद, पोपट साठे, आबा काटे, भीमाशंकर नारायणकर, अशोक नारायणकर, चंद्रकांत नारायणकर, योगेश नारायणकर, मोतीराम नारायणकर यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना मेजर मारुती जाधव म्हणाले, “पंजाबमध्ये शहीद भगतसिंग यांच्याविषयी आजही सामान्य जनतेच्या मनात मोठी श्रद्धा आहे. त्यांच्या देशभक्तीची प्रेरणा घेऊन अनेक युवक देशसेवेकडे वळतात. भगतसिंग यांच्यासारख्या स्वातंत्र्ययोद्ध्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाचे स्मरण प्रत्येक पिढीने ठेवणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांतून युवकांनी देशसेवा, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय खरटमल यांच्या हस्ते माजी सैनिक मेजर मारुती जाधव व मेजर लक्ष्मण राठोड यांचा सत्कार करण्यात आला. शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून उपस्थितांनी त्यांच्या त्यागाला अभिवादन करत देशभक्तीची ज्योत सदैव तेवत ठेवण्याचा संदेश दिला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!