

आळते लोकहिरा न्यूज प्रतिनिधी :सागर चौगुले
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची निर्धारित मर्यादा ओलांडून नियमबाह्य पद्धतीने ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी हातकणंगले पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमुळे विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याबाबत पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे.
कुंभोज येथे गणपती विसर्जनाच्या वेळी ध्वनिक्षेपकासाठी निर्धारित नियमांचे पालन करणे अपेक्षित होते. मात्र, दोन बेस आणि दोन टॉपची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक ध्वनिक्षेपक व मोठ्या आवाजात साउंड सिस्टिमचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकाराची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी कारवाई केली. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.
गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीत उत्साहासोबतच शासनाने घालून दिलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला.








