October 28, 2026 8:11 am

मतदारकेंद्री प्रक्रिया राबवा ; नाहक त्रास देवू नका  

एसआयआर प्रक्रिया पारदर्शक व सर्वसमावेशक पद्धतीने राबवा

– मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले

 

मतदारकेंद्री प्रक्रिया राबवा ; नाहक त्रास देवू नका

 लोकहिरा न्यूज वृत्तसेवा

कोल्हापूर,  (जिमाका) : मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने राबवावी. एसआयआरची संपूर्ण प्रक्रिया विहीत मुदतीत, जबाबदारीने पार पाडावी. सिटीझन फ्रेंडली अॅप्रोच ठेवावा, कोणत्याही मतदाराला नाहक त्रास देणे खपवून घेतले जाणार नाही, यामध्ये दोषी आढळल्यास कठोर कारवाई होईल, याची जाणीव ठेवून संवेदनशीलपणे मतदारकेंद्री प्रक्रिया राबवा, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली -उगले यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.  विजय राठोड, अपर आयुक्त महसूल स्वाती देशमुख, अपर जिल्हाधिकारी अजय पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

 

शीतल तेली-उगले म्हणाल्या, भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या वेळापत्रकानुसार 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार असल्याने सर्व यंत्रणांनी एसआयआर बाबतच्या प्रत्येक टप्प्याचे काटेकारपणे नियोजन करुन विहीत मुदतीत काम पूर्ण करावे. एकही पात्र मतदार यादीतून सुटणार नाहीत व एकही अपात्र मतदार यादीत समावेशित होणार नाही याबबत सजग राहून दक्षता घ्यावी. विसंगती असणाऱ्या प्रकरणांमध्ये कागदपत्रे पाहून बीएलओचे समाधान झाल्यास त्याच स्तरावरच निपटारा व्हावा. ज्या ठिकाणी नागरिकत्वासारखे महत्वाचे प्रश्न आहेत अशा ठिकाणी, अनमॅप्ड मतदारांच्या प्रकरणांमध्ये सुनावण्या घ्यावात. यामध्ये आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करा. तथापि, सुनावणी घेताना मतदाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करु नका, एखादा मतदाराचा नागरिकत्वाबदल शंका निर्माण झाल्यास कागदपत्रांची योग्य प्रकारे तपासणी करा, हे करत असताना मतदारकेंद्री प्रक्रिया राबवा, मतदाराला नाहक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या. मतदाराला एसआयआर प्रक्रियामध्ये नाहक त्रास होणे खपवून घेतले जाणार नाही. यासाठी सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व यंत्रणा जबाबदारीने काम करेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.

 

एका बीएलओकडील विषयांच्या सुनावण्या एकाच दिवशी संपतील याप्रमाणे कामकाजांचे नियोजन करावे असे सांगून त्या म्हणाल्या, सुनावणीसाठी नोटीस बजावताना संवादाची उपलब्ध सर्व माध्यमे वापरा. व्हॉट्सॲपसह ईमेल यांचाही प्रभावी वापर करा. ईआरओ डॅश बोर्डवरचा डाटा दररोज जतन करुन सुरक्षित ठेवा.

 

मतदार यादीत समावेश करणे अथवा यादीतील नावे वगळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत एक गठ्ठा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची सर्व पातळीवर दक्षता घ्या असे निर्देशित करुन श्रीमती तेली-उगले म्हणाल्या, फॉम क्रमांक 7 व 8 चा याचा गैरवापर होणार नाही यासाठी सजग रहा. मृत व्यक्तीचे नाव मतदार यादीतून नाव वगळताना मृत्यू प्रमाणपत्रांची तपासणी करुन आवश्यकती कार्यवाही करा. एसआयआर अंतर्गत कागदपत्र तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची तातडीने स्थापना करावी.प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील व्हीआयपी मतदारांची यादी तपासावी. एकाच कुटुंबातील मतदारांचे मतदान एकाच मतदान केंद्रावर राहील यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी आपल्या टीमचे कामकाज व्यवस्थितपणे सुरु राहील याची खात्री करण्यासाठी अचानक भेटी द्याव्यात. अंतिम मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि सर्व समावेशक होण्यासाठी सर्व यंत्रणांनी, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, विहीत कालावधीत प्रत्येक प्रक्रिया पूर्ण करण्याबरोबरच पात्र मतदारांचा मतदानाचा अधिकार अबाधित राहील याची विशेष दक्षता घ्यावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले 

दिलेल्या मतदार नोंदणी 31 ऑक्टोबर 2024 नंतर झालेली नाही त्यामुळे आता 18 वर्षावरील नव मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना यातील विद्यार्थी यांची विशेष मदत घ्यावी, यामध्ये चांगले काम करणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. स्वीप अंतर्गत उपक्रम प्रभावीपणे राबवावे. असे निर्देश श्रीमती तेली-उगले यांनी दिलेया बैठकीत जिल्ह्यात 33 लाख 55 हजार 244 एकूण मतदार आहेत. त्यापैकी 84.12 टक्के म्हणजेच 28 लाख 22 हजार 541 मतदारांचे मॅपींग झालेले आहे. 1 लाख 15 हजार 946 मॅपींग न झालेले मतदार असून 1 लाख 12 हजार 523 मतदारांच्या बाबतीत विसंगती आहेत. 1 लाख 42 हजार 748 मतदार मयत असून 97 हजार 547 मतदार गैरहजर आहेत. 1 लाख 58 हजार 348 मतदारांचे कायम स्वरुपी स्थलांतर झालेले आहे. 48 हजार 995 मतदारांची नावे दुबार आहेत. अनकलेक्टेबल मतदारांची संख्या 4 लाख 49 हजार 257 असून 1 हजार 619 मतदार अन्य कॅटागिरीतील आहेत. जिल्ह्यात 10 विधानसभा मतदार संघामध्ये 3455 मतदान केंद्रे असून नव्याने 5 मतदान केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. यामध्ये राधानगरी -1 करवीर व हातकणगंले मध्ये प्रत्येक 2 अशी वाढ आहे.  10 हजार 729 बीएलए ची नियुक्ती विविध राजकीय पक्षांमार्फत करण्यात आली आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!