October 28, 2026 7:25 am

समस्त कक्कया महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्ती सावळकर कोल्हापूर दौऱ्यावर; समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण

“एकीची मशाल हाती घेऊ, समाजहिताचा दीप पेटवू;

कक्कया समाजाच्या प्रगतीसाठी, खांद्याला खांदा लावून पुढे जाऊ!”

;-कोल्हापूर :येथील लोकहिरा न्यूज प्रतिनिधी समस्त कक्कया महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. निवृत्ती सावळकर साहेब रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी एकदिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आले असता समाजबांधवांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

उदयोजक अनिल राजहंश पोळ व किसन खंदारे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत असताना

आपल्या कौटुंबिक व धार्मिक कार्यक्रमातून वेळ काढून सावळकर साहेबांनी समाजातील ज्येष्ठ संचालक व उद्योजक श्री. अनिल राजहंस पोळ यांच्या ‘राजहंस डिलक्स’ येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत समाजबांधवांशी स्नेहपूर्ण संवाद साधला.

यावेळी अनिल राजहंस पोळ व किसन खंदारे यांच्या हस्ते निवृत्ती सावळकर साहेबांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. समाजातील अनेक ज्येष्ठ मंडळींनी उपस्थित राहून सामाजिक प्रश्न, समाजाची वाटचाल, तरुण पिढीची भूमिका आणि भविष्यातील समाजकार्य याबाबत मनमोकळेपणाने चर्चा केली.

सावळकर साहेबांच्या कोल्हापूर दौऱ्याचे औचित्य साधून कोल्हापूर वीरशैव कक्कया समाजाच्या सर्व संचालकांनीही ‘राजहंस डिलक्स’ येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांवर तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातील उपक्रमांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष शिवाजी पोळ, उपाध्यक्ष गणेश नारायणकर, सेक्रेटरी राहुल सोनवणे, निरंजन कदम, सुदेश व्हटकर, प्रकाश व्हटकर, विजय सोनवणे, साप्ताहिक लोकहिरा न्यूजचे संपादक गणपती शिंदे, संजय व्हटकर, अर्जुन कावळे साहेब,गंगाराम व्हटकर, डॉक्टर अशोक पोळ व दिलीप कोकणे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.

समाजाच्या एकजुटीचा संदेश

निवृत्ती सावळकर साहेबांच्या या भेटीमुळे समाजातील ज्येष्ठ, तरुण आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. समाजाच्या प्रगतीसाठी मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने काम करण्याचा निर्धार या भेटीतून अधिक दृढ झाला.

“एक विचार, एक दिशा, एकजूट आपली शान;
कक्कया समाजाच्या उन्नतीसाठी, सदैव राहू एकदिलाने महान!
सेवेची वाट, प्रगतीची साथ—
हीच समाजाच्या उज्ज्वल भविष्याची नवी पहाट!”

अशा उत्साहवर्धक वातावरणात ही सदिच्छा भेट संपन्न झाली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!