August 3, 2026 5:01 pm

चित्सा फ्युएल (IndianOil) पेट्रोल पंपाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर, लोकहिरा न्यूज प्रतिनिधी :
रंकाळा परिसरातील नागरिकांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि पारदर्शक इंधन सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या चित्सा फ्युएल (IndianOil Retail Outlet) या अत्याधुनिक पेट्रोल पंपाचा भव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. “विश्वास, गुणवत्ता आणि उत्कृष्ट सेवा यांचे नवे केंद्र” या संकल्पनेतून सुरू झालेल्या या पेट्रोल पंपाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रंकाळा–फुलेवाडी परिसर हा कोल्हापूर शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग असून या परिसरातील वाहनधारकांना आता अत्याधुनिक सुविधा आणि दर्जेदार इंधन सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रंकाळा व फुलेवाडी परिसरातील वाढती वाहतूक लक्षात घेता हा पेट्रोल पंप नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. दर्जेदार सेवा आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी चित्सा फ्युएल निश्चितच आदर्श ठरेल, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
मा. आमदार तथा माजी मंत्री विनय कोरे यांनी पेट्रोल पंपाचे मार्गदर्शक अँड. सुरेश कांबळे व श्री. चंद्रकांत खरटमल यांच्या शासकीय सेवेत असताना केलेल्या प्रामाणिक व प्रभावी कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या कार्याची जशी सकारात्मक छाप समाजात निर्माण झाली, तशीच दर्जेदार आणि प्रामाणिक सेवा त्यांच्या पुढील पिढीकडूनही नागरिकांना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मा. आमदार तथा माजी मंत्री सतेज (बंटी) पाटील यांनी “चित्सा” या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना तो “शुद्ध आणि निर्मळ” असा असल्याचे सांगितले. या नावाप्रमाणेच येथे ग्राहकांना शुद्ध, गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह इंधन मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मा. आमदार चंद्रदीप नरके यांनी हा पेट्रोल पंप शहरातील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. कोल्हापूरच्या पर्यटन विकासालाही याचा सकारात्मक फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यास मा. उपमहापौर अक्षय विक्रम जरग, नगरसेवक, माजी परिवहन आयुक्त दिलीप जाधव (IAS), विशाल झोपे (इंडियन ऑइल सेल्स ऑफिसर) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी अँड. सुरेश कांबळे, श्री. चंद्रकांत खरटमल आणि श्री. हरिदास सोनवणे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले. उपस्थितांनी नवीन उपक्रमासाठी शुभेच्छांचा वर्षाव करत समाधान व्यक्त केले.
पारदर्शक व्यवहारासाठी अत्याधुनिक सुविधा
चित्सा फ्युएलची विशेष बाब म्हणजे ग्राहकांच्या विश्वासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. पेट्रोल पंपावरील प्रत्येक डिस्पेन्सरवर अत्याधुनिक CCTV कॅमेरे बसविण्यात आले असून इंधन भरण्यावेळी मीटर रीडिंगचे चित्रण करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना व्यवहारातील पूर्ण पारदर्शकता अनुभवता येणार असून कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला आळा बसणार आहे. या आधुनिक सुविधेचे उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी विशेष कौतुक केले.
ग्राहकांचा विश्वास जपण्याचा संकल्प
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. रिचा नरेन खरटमल, डीलर – चित्सा फ्युएल (IndianOil) यांनी उपस्थित सर्व मान्यवर, नागरिक, मित्रपरिवार, नातेवाईक आणि शुभचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले. ग्राहकांना दर्जेदार इंधन, पारदर्शक व्यवहार आणि उत्कृष्ट सेवा देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. ग्राहकांचा विश्वास जपणे आणि तो अधिक दृढ करणे हेच आपल्या कार्याचे प्रमुख ध्येय राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
“आपल्या सेवेत सदैव तत्पर” या ब्रीदवाक्यासह चित्सा फ्युएल आता कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल झाले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!