August 3, 2026 5:08 pm

पुरस्काराने समाजकार्याची ऊर्जा अधिक वृद्धिंगत.

लोकहिरा न्यूज वृतसेवा
कोल्हापूर येथील अवनि संस्थेतर्फे आयोजित “अरुणोदय पुरस्कार २०२६” सोहळा हॉटेल ओपल येथे उत्साहात पार पडला. समाजातील वंचित, गरजू व दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान यावेळी करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ समाजकार्यकर्त्या डॉ. प्रमिला जरग यांना “अरुणोदय पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला.
डॉ. प्रमिला जरग यांनी मनोगतात सांगितले की, अशा पुरस्कारांमुळे समाजकार्याची प्रेरणा व ऊर्जा अधिक वाढते. डॉ. सूरज पवार, डॉ. भारती पाटील व डॉ. मंजिरी मोरे-देसाई यांनी समाजकार्याचे महत्त्व अधोरेखित करत अवनि संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास किरण माने, अतुल देसाई, संजय पाटील, व्यंकप्पा भोसले, साताप्पा मोहिते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक जयसिंगराव कदम यांनी केले, सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी तर आभार प्रदर्शन जैनुद्दीन पन्हाळकर यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!