“साप्ताहिक लोकहिरा न्यूज च्या तृतीय वर्धापन दिना निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचे आयोजन.
कोल्हापूर येथील;- प्रतिनिधी नितीन दबडे
ऐतिहासिक छत्रपती शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे 8 मार्च 2026 रोजी” ठिक 2 वाजता.संविधान विचार मंच व साप्ताहिक लोकहिरा न्यूज च्या वतीने सालाबाद प्रमाणे लोकहिरा न्यूज च्या वर्धापन दिनी समाजहितासाठी कार्यरत असणारे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, उद्योजक, कला, क्रीडा, अशा सर्व विविध क्षेत्रात अभिमानास्पद कार्यरत असणारे पात्र मान्यवरांना 8 मार्च 2026 रोजी,रविवार महिला दिनाचे औचित साधत,राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार दिग्गज मान्यवर
किसन तातोबा खंदारे (उद्योगपती),चंद्रकांत मारुतीराव खरटमल(जॉंईंट ट्रान्सपोर्ट कमिशनर महाराष्ट्र राज्य),दत्ता मांजरे (तारदाळकर),हे प्रमुख पाहुणे म्हणून तर या कार्यक्रमाचे आकर्षक म्हणून प्रसिद्ध कलाकार कल्लोळ बच्चन असणार आहेत तसेच
शिवानी निंगप्पा गजबर (समाजसेविका) यांच्या महिला आणि महिलांचे अधिकार या विषयावरील व्याख्याना चे हि आयोजन केले आहे.या कार्यक्रमात राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकातील आजादी की जंग च्या कलाकार साथी.सुषमा अरुणराव साळुंखे,हातकणंगले पंचायत समितीच्या नूतन सदस्या प्रियंका प्रवीण खोबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान विचार मंच कोल्हापूर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष
आयु.संजय महादेव कांबळे यांच्या अध्यक्षते खाली, दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात येणार आहे.ते पुढील प्रमाणे जगन्नाथ बापूसो कांदळकर यांना क्रांतीबा महात्मा फुले समाजभूषण पुरस्कार, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले समाजरत्न पुरस्कार, शिवाजी संभाजी पोळ, व राजेंद्र किसन कोरे, यांना तसेच शिवानी निगप्पा गजबर,पुष्पा किरण काकडे,यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्शवंत समाजसेविका व महात्मा फुले आदर्शवंत समाजसेवक म्हणून विलास महादेव बुचडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श अनाथाची माय म्हणून जयश्री दीपक बुचडे,आदर्श उद्योजिका व कलाकार म्हणून साथी सुषमा अरुणराव साळुंखे, व महात्मा फुले आदर्श उद्योगपती किसन तातोबा खंदारे व उद्योजक म्हणून दुर्योधन मधुकर कदम,उत्कृष्ट सेवावृत्ती कराओके गायक पुरस्कार अभयकुमार नारायण नेर्लेकर, मरणोत्तर जिवनगौरव पुरस्कार कै रमेश लक्ष्मण सोनवणे द्वारा युवराज सोनवणे,अँड.सोनाली मिलिंद किल्लेदार-आदर्शवंत वकील, डॉ.महावीर आप्पाण्णा कुरडे-“आदर्शवंत डॉक्टर”, शिवलिंग अनंत कळंत्रे -“आदर्शवंत संस्थापक”,श्रीमती. विजया दत्तात्रेय माळी (तोडकर)-“ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्शवंत अधीक्षक”,
आयु.विश्वास शांताबाई आबा कांबळे”क्रांतीबा महात्मा फुले आदर्श मुख्याध्यापक”,आदर्शवंत शिक्षक म्हणून उत्तम आनंदा हवालदार –
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्शवत शिक्षिका म्हणून,उज्वला महेश पाटणकर, कल्याणी राहुल पाटील,वैशाली वसंत मगदूम(कमते),शहनाज आरिफ मोमीन,पायल प्रवीण काकती,राखी शिवकुमार मुरतले यांना तसेच महात्मा फुले आदर्शवंत पत्रकार नितीन दबडे,
अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी पांचाळ या करणार आहेत तर संपादक गणपती शिंदे लोकहिरा न्यूज आणि संविधान विचार मंचचे अध्यक्ष रमाकांत बुद्धीसागर व पदाधिकारी यांच्या द्वारे कार्यक्रमास उपस्थिती रहाणेचे आवाहन करण्यात येत आहे.(सदर कार्यक्रम वेळेवर सुरू होईल.)














