राजाराम तलाव परिसरात गांजाचा *मोठा साठा जप्त; 83 किलो 145 ग्रॅम गांजासह 25 लाख 88 हजारांचा मुद्देमाल हस्तगत* 

कोल्हापुर येथील लोकहिरा न्यूज प्रतिनिधी:-
राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला 83 किलो 145 ग्रॅम गांजाचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला असून, या कारवाईत एकूण 25 लाख 88 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई दि. 28 जानेवारी 2026 रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राजाराम तलाव गेटसमोर, सरनोबतवाडी ते शिवाजी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.
या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात NDPS Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये वेगवेगळ्या रंगांच्या 4 नायलॉन पिशव्यांमध्ये प्रत्येकी 10 पॅकेट असे एकूण 40 पॅकेट गांजा
अंदाजे किंमत 20,78,625/-,
अशोक लेलँड कंपनीचा पांढऱ्या रंगाचा टेम्पो क्रमांक MH-12-QG-1095
किंमत – ₹5,00,000/-,
मोबाईल फोन 10,000 रू.असा एकूण ₹25,88,625/-हजारांचा मुद्देमाल हस्तगत
करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराच्या माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वीपणे करण्यात आली. संशयित आरोपी
समीर पापा शेख, वय 34 वर्षे
रा. साईनगर, कात्रज, पुणे त्याला ताब्यात घेण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सतीश होडगर – पोलीस निरीक्षक,भारत साळुंखे, रणजित पाटील – सहाय्यक पोलीस निरीक्षक,
सचिन चंदन – पोलीस उपनिरीक्षक,
अमोल पाटील, कृष्णात पाटील, संदीप सावंत, सत्यजित सावंत, सुशांत तळप, अमोल पाटील, यांचा सहभाग होता.
पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांच्या निर्देशानुसार अवैध अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.













