
सोलापूर येथील लोकहिरा प्रतिनिधी.

ना.म.शिंदे हे महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीतील जहाल विचारवंत आहेत.
मराठी साहित्य विश्वात व शासन दरबारी सन्मानित. ना.म.शिंदे लिखीत कथा,कवितांचा शासनाच्या शिक्षण विभाग व विद्यापीठाच्या दहावी, बारावी,बी.ए.एम.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश आहे.
भारत सरकारच्या भा रा से या उच्चपदस्थ सेवेत असताना ही कधीही बडेजाव न करता तळागाळातील लोकांशी संपर्क.कुणाच्या वैयक्तिक अध्यात किवां मध्यात नसतात. तत्वासाठी मोडणार ही नाही आणि वाकणार ही नाही हा बाणा.हाती घेतलेले कार्य निष्ठापूर्वक करणारा प्रसंगानुरूप जहाल व संयम ठेवणारे, व्यक्तिमत्त्व.जिथे जीव लावला तिथे अमाप प्रेम करणारा दिलदार दिलखुष असे मित्र होतात.
जातीच्या परिघा पलिकडे ही स्व: कर्तृत्वाने ” ना.म.” या नावाने सर्वदूर परिचित. प्रखर बांधिलकीने सामाजिक कार्य करताना योग्य ठिकाणी तन,मन व धन लावणारे खंबीर नेतृत्व आहे.याचे उदाहरण म्हणजे बी के सी येथील जागा वाचविणारा प्रमुख योद्धा.
समाजातील सर्वसामान्य माणसाच्या उन्नतीसाठी ” एक गाव एक संघटना” व ” पे बॅक टू सोसायटी ” या संकल्पनेचा पुरस्कर्ता.
तरूण पिढीला योग्य मार्गदर्शन करताना स्वतःचे वेगळेपण जपणारा वडीलधारी. आदरणीय सुशीलकुमार शिंदे याचा घनिष्ठ नातलग व बालपणापासून आज पर्यंत ही सहवास लाभलेली भाग्यवान व्यक्ती.त्याचा कधीही तोरा न मिरविणारा संयमी संयत माणूस हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.ना.म.शिंदे हे विद्यापीठात कबड्डी पटू होते.ते चांगले चित्रकार आहेत.ते दोन मराठी सिनेमाचे सहनिर्माते होते. आता पर्यत त्यांनी सौ अरुणा काकी सहकुटूंब 17 देशांना भेट दिली आहे.
ऑस्ट्रेलियात त्यांचे सुपुत्र डॉ.राजीव व सुनबाई डॉ.नेहा ( कॅन्सर सुपर स्पेशालिस्ट),नातू रेयान व सुपुत्री डॉ.प्रियांका व जावंई डॉ.जयदीप मेनन ( डेंटीस्ट ),नातू रिगेल असा परिवार आहे.
ना.म.शिंदे हे कक्कय्या डोहर समाजाचे कट्टर पुरस्कर्ते आहेत.
ना.म.शिंदे याना सामाजिक व राजकीय वारसा त्यांचे वडील *स्वातंत्र्य सैनिक व माजी नगरसेवक कै.महादेव भैरू शिंदे* यांच्या कडून लाभला आहे.
या अशा बहूआयामी व्यक्तीमत्वाचा आम्हाला अभिमान आहे.ते सर्वार्थाने समृद्ध संपन्न जगतात.त्याना आरोग्य संपन्न आयुष्य लाभो हीच प्रार्थना.76 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपण आमचे काका म्हणून प्रेरणास्थान व आदर्श आहात.
आपले मार्गदर्शन, सहकार्य व आशीर्वाद सदैव राहू द्या.
*शुभेच्छुक*
🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🎂🎂🎂🎂🎂🎂
साथी गणपती शिंदे
संपादक
साप्ताहिक लोकहिरा न्यूज व लोकहिरा न्यूज चैनल तसेच
शिंदे परिवार,
संत कक्कया विचार मंच महाराष्ट्र.












