April 18, 2026 1:21 am

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्बची धमकी; प्रशासनात एकच खळबळ

कोल्हापूर : लोकहिरा न्यूज प्रतिनिधी

पुरस्कारा साठी लोकहिरा आपणास अवाहन करीत आहे .

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर “५ आरडीएक्स बॉम्ब लावले आहेत, लवकरच फुटणार” असा थरकाप उडवणारा संदेश पाठवला अनोळखी व्यक्तीने… आणि पाहतापाहता प्रशासनात एकच खळबळ उडाली.

 

आज सकाळी (दि.१२ डिसेंबर) मिळालेल्या या ई-मेल धमकीने जिल्हाधिकारी कार्यालयात अक्षरशः धावपळ माजली. धमकीचा ई-मेल पाहताच जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कळविले आणि क्षणातच पोलीस यंत्रणा सतर्क झाली.

 

दरम्यान, कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) झपाट्याने कार्यालय परिसरात दाखल झाले आणि इमारतीचा कोपरा-कोपरा पिंजून काढण्याची मोहीम सुरू केली. अग्निशमन दलाच्या गाड्यादेखील आवारात दाखल झाल्याने वातावरणात तणाव आणि भीतीचे सावट पसरले.

 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून तपासणी सुरू आहे. प्रवेशद्वारावर कडक नियंत्रण, चौकशी आणि तपासणी… संपूर्ण परिसर अक्षरशः पोलिसांनी कवेत घेतला आहे.

 

धमकी देणारा ई-मेल कोणाच्या आयडीवरून आला? कोण आहे हा धमकीबाज? याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलचे पथक सक्रिय झाले असून पोलिसांनी तपास सुरू केल्याचे सूत्रांकडून कळते.

 

बॉम्ब धमकीचा मेल… प्रशासनाची धावपळ… पोलीस यंत्रणेची सतत नजर… आणि नागरिकांमध्ये वाढलेली चिंता—

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिवसभर तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!