April 18, 2026 1:42 am

विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या इसमास एलसीबीकडून अटक.५८,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी:- गणेश नारायणकर

  अवैध व्यवसायाची माहिती घेऊन त्यावर कायदेशीर कारवाई  करण्याचे काम पोलीस खात्याकडून चालू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे  सहा.पोलीस निरीक्षक सागर वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली की किरण लक्ष्मण सासने, वय ३२, रा.झेंडा चौक, वसगडे हा इसम त्याच्या घराच्या मागील बाजूस विनापरवाना सिंधी ताडीमाडीची व विदेशी दारूची विक्री करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार सहा.पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने सापळा रचून किरण सासने याला ताब्यात घेतले.त्याच्याकडील ५११ लिटर सिंधी ताडीमाडी व रॉयल स्टेग डिलक्स विस्कीच्या ३० बाटल्या असा एकूण ५८,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

          ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण,सहा.पोलीस निरीक्षक सागर वाघ,अमित मर्दाने,रामचंद्र कोळी,विनोद कांबळे,वसंत पिंगळे,प्रवीण पाटील,रुपेश माने,योगेश गोसावी यांनी मिळून केली.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!