October 28, 2026 9:08 am

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव,.. लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल जयसिंगपूर च्या अंतराळवीर आम्ही.. या नाटकास तृतीय क्रमांक…

लोकहिरा न्यूज वृत्तसेवा

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव,.. लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल जयसिंगपूर च्या अंतराळवीर आम्ही.. या नाटकास तृतीय क्रमांक… राष्ट्रीय संग्रहालय परिषद, भारत सरकार, नेहरू विज्ञान केंद्र, शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य व पंचायत समिती शिरोळ यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2026 -स्पर्धेत लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल जयसिंगपूर या शाळेने उज्वल यश संपादन केले.. विज्ञान आणि अंतराळातील घडामोडी या मुख्य विषयांतर्गत सादर केलेल्या अंतराळवीर आम्ही या विज्ञान नाटकाने तृतीय क्रमांक पटकावला.. ही स्पर्धा 12 सप्टेंबर 2026 रोजी जयसिंगपूर या ठिकाणी पार पडली.. अंतराळातील घडामोडी या उप विषयावर आधारित असलेल्या या नाटकात विद्यार्थ्यांनी अंतराळ संशोधन आणि विविध ग्रह ,तारे, व आकाशगंगा यांची मांडणी उत्कृष्ट अभिनयाद्वारे केली.. या नाट्यातील बालकलाकार व पात्र परिचय. तनिष प्रवीण राजोपाध्ये .. मुकुंद.. अत्रेय पारगावकर… राहुल.. सानवी इंगळे… आई,. आराध्या बामणे… सूत्रधार… वृंदा पाटील.. रिटा. अर्णवी दीक्षांत… अस्मिता… समृद्धी आडके… शिल्पा मॅडम आणि स्वरा सावंत.. सायली मॅडम… लेखन, दिग्दर्शन. श्री भरत खिचडी.. तांत्रिक विभाग.. कु . नमीरा शिकलगार,. संकल्पना, निर्मिती श्री. सतीश चिपरीकर, नेपथ्य.. सौ. किमया पवार.. विशेष मार्गदर्शन.. श्री. सयाजीराव पाटील…. विद्यार्थ्यांच्या या नेत्र दीपक यशाबद्दल व उत्कृष्ट सादरीकरण बद्दल संस्था पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक वृंद व पालकांकडून सदर विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे….

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!