October 28, 2026 7:11 am

कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार कांबळे; उपाध्यक्षपदी दत्तात्रय टिपुगडे

 

 

नंदकुमार कांबळे, दत्तात्रय टिपुगडे.अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

कोल्हापूर :लोकहिरा न्यूज प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्या., कोल्हापूरच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडीत पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक नंदकुमार कांबळे यांची, तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय टिपुगडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

पतसंस्थेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. मा.मुरुडकर साहेब, उपनिबंधक कार्यालय, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली. पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक नंदकुमार कांबळे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. तसेच दत्तात्रय टिपुगडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या प्रसंगी संस्थेचे गटनेते रघुनाथ मांडरे यांनी मा.मुरुडकर साहेब यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यानंतर पतसंस्थेचे नूतन अध्यक्ष नंदकुमार कांबळे यांच्या नावाचा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. उपाध्यक्षपदासाठी दत्तात्रय टिपुगडे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. दोन्ही प्रस्तावांना उपस्थित संचालकांनी एकमताने अनुमोदन दिल्याने निवड बिनविरोध पार पडली.

यावेळी माजी संचालक व गटनेते रघुनाथ मांडरे यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच समिती सदस्य रविंद्र मोरे यांच्या कामाचा आढावा घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक आर. बी. कांबळे यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रकाश पोवार यांनी मनोगत व्यक्त करत नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नंदकुमार कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दत्तात्रय टिपुगडे यांनी संस्थेच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने पतसंस्थेच्या प्रगतीसाठी काम करण्याची ग्वाही दिली. त्यांच्या निवडीचे संस्थेचे माजी अध्यक्ष संजय कांबळे, उपाध्यक्ष बी. एम. कांबळे, गटनेते रघुनाथ मांडरे, तज्ज्ञ संचालक राहुल माणगावकर, माजी संचालक प्रकाश पोवार, विकास कांबळे,आर. बी. कांबळे, योगेश वराळे, दिलीप वायदंडे, , विलास दुर्गाडे, सुजाता भास्कर, सुजाता देसाई, व्यवस्थापक बाबूराव साळोखे, समीर कळके तसेच संस्थेचे कर्मचारी, हितचिंतक, सभासद व उपस्थितांनी अभिनंदन केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!