नशिल्या इंजेक्शनची विक्री करणारा तरुण अटकेत.
एक लाख बारा हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.
कोल्हापूर – (लोकहिरा न्यूज वृत्तसेवा )
इचलकरंजी येथे नशिली Mephentermine Suaphlfet इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करीत असलेल्या यड्रावच्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली असून त्याच्या कडुन सुमारे एक लाख बारा हजार तीनशे एक्यान्नव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार उत्तम प्रकाश टॉकीज परिसरात सापळा रचून साहिल किरण पाटील (वय 19.

रा.यड्राव,ता.हातकणंगले) याला ताब्यात घेतले.साहिल पाटील याच्या ज्यूपिटर मोपेडच्या डिकीतून Mephentermine Suaphlfet या नशिल्या इंजेक्शनच्या 67 बाटल्या,मोबाईल फोन व मोपेड असा मुद्देमाल मिळून आला.
वैद्यकीय परवाना व डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशिल्या इंजेक्शनची विक्री केल्या प्रकरणी साहिल पाटील याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.नशिल्या इंजेक्शनची विक्री करणारा तरुण अटकेत.
एक लाख बारा हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.
कोल्हापूर – इचलकरंजी येथे नशिली Mephentermine Suaphlfet इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करीत असलेल्या यड्रावच्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली असून त्याच्या कडुन सुमारे एक लाख बारा हजार तीनशे एक्यान्नव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार उत्तम प्रकाश टॉकीज परिसरात सापळा रचून साहिल किरण पाटील (वय 19. रा.यड्राव,ता.हातकणंगले) याला ताब्यात घेतले.साहिल पाटील याच्या ज्यूपिटर मोपेडच्या डिकीतून Mephentermine Suaphlfet या नशिल्या इंजेक्शनच्या 67 बाटल्या,मोबाईल फोन व मोपेड असा मुद्देमाल मिळून आला.
वैद्यकीय परवाना व डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशिल्या इंजेक्शनची विक्री केल्या प्रकरणी साहिल पाटील याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.












