April 18, 2026 12:30 am

अन्यायाचा पाढा पुन्हा एकदा वाचणार, भिक मागो आदोलनातून.

जाहिराती साठी व पुरस्कारा साठी संपर्क 7276756577

मुख्य कार्यकारी अधिकारीविरोधात गायकवाड कुटुंबियांचे 19 रोजी भिक मागो आंदोलन

तिळवणी येथील ;-लोकहिरा न्यूज प्रतिनिधी सागर चौगुले

सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड हे सोमवारी 19 जानेवारी रोजी सहकुटुंब भिक मागो आंदोलन करणार आहेत . जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.  यांच्या विरोधात आणि यांच्यासाठीच हे आंदोलन असल्याचे सुनील गायकवाड यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

गायकवाड यांचा प्लॉट गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांच्या घरगड्याच्या नावावर ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांनी लावला आहे. या विरोधात अनेक वेळा आंदोलन करूनही मुख्य कार्यकारी अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत. मागास समाजावर अन्याय तर सवर्ण समाजाला वेगळा न्याय लावतात , संविधानाची अंमलबजावणी करताना पक्षपातीपणा करतात, आम्ही मागासवर्गीय असल्यानेच कार्तिकेयन हे जातीयवादातून अन्याय करत आहेत. ग्रामसेवक व सरपंच –  सदस्य तसेच तंटामुक्ती समिती व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना अर्थपूर्ण वाटाघाटी करून वाचवत असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला आहे. दसरा चौक ते जिल्हा परिषद भिक मागो आंदोलन करून जमलेली भीक कार्तिकेयन यांना देऊन आमच्यावरील अन्यायाचा पाढा पुन्हा एकदा वाचणार असल्याचेही गायकवाड यांनी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!