April 18, 2026 3:46 pm

ॲड ममतेश आवळे यांना “सुर्यपुत्र भैय्या साहेब आंबेडकर” पुरस्कार जाहीर..

लोकहिरा न्यूज आपणास पुरस्कारा साठी अवाहन करीत आहे संपर्क 7276756577
जाहिराती साठी संपर्क 7276756577

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी : 

 

       कुरुंदवाड  :-येथील सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲड. ममतेश आवळे यांना ” सुर्यपुत्र यशवंत ऊर्फ भैय्या साहेब आंबेडकर ” पुरस्कार जाहीर करण्यात आला..

 

            ॲड.ममतेश आवळे यांनी दिलेल्या बुद्ध,शिव, शाहू, फुले, आंबेडकर चळवळीत दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना या वर्षीचा सन 2025 – 26 प्रतिष्ट्येचा भारतीय बौद्ध महासभा तर्फे देण्यात येणारा “सूर्यपुत्र यशवंत ऊर्फ भैया साहेब आंबेडकर” हा मानाचा पूरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.. 

ॲड आवळे यांनी आजपर्यंत निषापाप तसेच अन्याय ग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच

ॲड आवळे यांनी वक्ते म्हणून  शिव,फुले,शाहू,आंबेडकर, बसवेश्वर या सह विविध विषयावर 2000 पेक्षा जास्त व्याख्याने महाराष्ट्र तसेच कर्नाटक या राज्यात दिली आहेत, तसेच विविध विषयावर लेखन चालू आहे.त्यांना आता पर्यंत 3 राष्ट्रीय व 32 राज्यस्तरीय  पुरस्कार देण्यात  येत आहेत,सविंधान सन्मान परिषद चे त्यांनी यशस्वी आयोजन केले होते, तसेच त्यांचे ते निमंत्रक आहेत.या सर्व गोष्टींची दखल घेऊन..भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र भोसले, श्री. संतोष भुयेकर सर चिटणीस, श्री. सतीश माणगावकर कोषाध्यधक्ष्. श्री.सुरेश सिद्धार्थ ऑडिटर .तालुका अध्यक्ष श्री.बबन कांबळे, श्री. नितीन शिंगे समता सैनिक दल सचिव, यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली .

 

                        या निवडीने जिल्ह्यातून विविध मान्यवर व कार्यकर्त्यांकडून  त्यांच्या वर शुभेच्छा चा  वर्षाव होत आहे.

 

         सदरचा पुरस्कार कोल्हापूर येथील शाहू स्मारक येथे 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार.

 

           तरी या कार्यक्रमास आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी. बहुसंख कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!