April 18, 2026 5:21 pm

विद्यार्थ्यांनी देश सेवेचे व्रत हाती घ्यावी– लेफ्टनंट सई संदीप जाधव

जयसिगपुर येथील लोकहिरा न्यूज

लोकहिरा न्यूज आपणास पुरस्कारा साठी अवाहन करीत आहे संपर्क 7276756577

 

वृत्तसेवा

लेफ्टनंट सई संदीप जाधव हिचा लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलमध्ये भव्य सत्कार समारंभ संपन्न

        विद्यार्थ्यांनी देश सेवेचे व्रत हाती घ्यावी– लेफ्टनंट सई संदीप जाधव

             डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या (IMA) 93 वर्षाच्या इतिहासात प्रथमच प्रशिक्षण पूर्ण करून पहिली महिला अधिकारी   लेफ्टनंटपदी सई संदीप जाधव हिची निवड झाल्याबद्दल  सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर संचलित श्रीमती यशोदा मालू शिशु मंदिर ,कै. श्री. रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिर व लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.  

     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल विक्रम नलवडे ,कमांडिंग ऑफिसर, 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते लेफ्टनंट  सईचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लेफ्टनंट सई जाधव हिला सन्मानपत्रही प्रदान करण्यात आले. 

     याप्रसंगी कर्नल विक्रम नलवडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी हा देश प्रेमासाठी झटून गेला पाहिजे आणि एक कर्तव्य म्हणून देश सेवा करावी, असे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी लेफ्टनंट सई जाधव हिची  जीपमधून मिरवणूक काढण्यात आली .हलगी, ढोल ,ताशांच्या गजरामध्ये लक्ष्मीनारायण मालु हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे लेझीम पथकाने तिला कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आले. फुलांच्या पायघड्यावरून तिचे आगमन होत असताना विद्यार्थिनींनी  फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला .

     कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सयाजीराव पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख एनसीसी प्रमुख श्री. सतीश भोसले यांनी करून दिली. सन्मानपत्राचे वाचन जिमखाना प्रमुख श्री. सुनील हजारे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटीचे चेअरमन मा. राजेंद्रजी मालू हे होते .त्यांनी अध्यक्षीय भाषणात सईचे कौतुक करताना तिच्या भावी उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. लेफ्टनंट सईने सत्काराला उत्तर देताना मोठ्या संख्येने देशसेवेचे व्रत विद्यार्थ्यांनी हाती घ्यावे यासाठी मानसिक, शारीरिक व बौद्धिक कसरतीची ही तयारी ठेवावी लागेल ,असे आवाहन केले .तसेच प्रशिक्षणादरम्यान आलेले स्वअनुभव कथन केले.                    कार्यक्रमासाठी सईचे वडील मेजर संदीप जाधव ,स्कूल कमिटी सदस्य मा.चंद्रकांत जाधव , सईची आई सौ. ज्योती जाधव , श्री. राजेश जाधव,पय॑वेक्षक श्री.एस.एल.चिपरीकर,सौ.घेवारी मॅडम, स्कूल कमिटी व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, बळवंतराव झेले हायस्कूल ,कन्या महाविद्यालय,  जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर, कस्तुरी बाई वालचंद कॉलेज, सांगली यांचे कॅडेट्स व  एनसीसी अधिकारी आवर्जून उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे संयोजन लक्ष्मीनारायण मालू  हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सयाजीराव पाटील,रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील कोळी व यशोदा मालू शिशुमंदिर विभागप्रमुख सौ.घेवारी यांनी व सर्व शिक्षक बंधू भगिनींनी केले होते.     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.ए.के. भिलवडे व श्री.एस.बी. पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन श्री‌. सुनील कोळी यांनी केले .

    कार्यक्रमासाठी बालवाडी ते दहावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी ,पालक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!