April 18, 2026 7:34 am

*सादळे–मादळे रोडवरील डोंगरावर गवताला आग; डीसीएफ धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाची तत्पर कारवाई*

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी

आग विझवताना वन विभागाचे कर्मचारी
लोकहिरा न्यूज वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार साठी सपर्क साधावा

सादळे–मादळे रोड परिसरातील डोंगरावर मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास गवताला आग लागल्याची घटना घडली. सदर आग वन विभागाच्या पेट्रोलिंग दरम्यान निदर्शनास आली.

आगीची माहिती मिळताच कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक (DCF) धैर्यशील पाटील यांनी तात्काळ परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांच्या निर्देशानुसार तत्काळ कारवाई सुरू करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, डीसीएफ धैर्यशील पाटील हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून प्रत्यक्ष आग विझविण्याच्या कामात सहभागी झाले होते.

यानंतर त्यांच्या सूचनेनुसार पन्हाळा वनपरिक्षेत्र व करवीर वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पन्हाळा व करवीर टीमच्या संयुक्त प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

डोंगर उतारावरील कोरड्या गवतामुळे आग वेगाने पसरण्याची शक्यता होती. मात्र वेळेत व समन्वयाने केलेल्या कारवाईमुळे आग अधिक पसरली नाही. या कारवाईमुळे परिसरातील वनसंपदा तसेच वन्यजीवांचे मोठे नुकसान टळले असून निसर्ग व वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यात यश आले आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वन विभागाकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन परिसरात नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, आग लागेल असे कोणतेही कृत्य करू नये, तसेच आगीची घटना आढळल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!